बंद

    पुनर्वसन शाखा

    ➤ अमरावती विभागातील पुनर्वसन शाखेमध्ये सिंचन अनुशेष व अनुशेषा व्यतिरिक्त प्रकल्पांतर्गत भूसंपादन व पुनर्वसनाची कामे तसेच राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे महामार्ग, विमानतळ इ. प्रकल्पांतर्गतचे भूसंपादनांच्या कामांचे संनियंत्रण केल्या जाते.

    ➤ पुनर्वसन शाखेमध्ये खालील कायद्यांनुसार कामकाज चालते.

    • न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३
    • महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश, महसूल व वन विभाग दि. २७.०८.२०१४
    • महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९
    • भूमी संपादन अधिनियम, १८९४
    • रेल्वे अधिनियम, १९८९
    • राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६
    • A Manual of Guidelines on Land Acquisition for National Highways under The National Highways Act, १९५६
    • महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५

    ➤पुनर्वसन शाखमध्ये प्रत्यक्ष चालणारे महत्वाचे कामकाज.

    • महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ कलम ११ (१) व कलम १३ (३) ची अधिसुचना प्रसिद्धी
    • न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १८ नुसार पुनर्वसन आराखडा मंजुरी
    • महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ कलम १० (३) नुसार पुनर्वसित गावठाणात पुरवावयाच्या १८ नागरी सुविधा अंदाजपत्रकांना मान्यता प्रदान करणे (मा. विभागीय आयुक्त- प्रशासकीय मंजुरी अधिकार रु. १ ते १० कोटी पर्यंत)
    • पीएमजी व प्रगती पोर्टलवरील विषयांचा आढावा
    • गावठाण विस्तार योजना प्रकरणे
    • अमरावती विभागातील पुरग्रस्त पुनर्वसन
    • मुल्यांकन तज्ञ पथक व भूसंपादन अधिकारी यांचे अस्थायी पदांना मुदतवाढीचे प्रस्ताव शासनास सादर करणे व आस्थापना विषयक बाबी.