ताळमेळ शाखा
ताळमेळ शाखेची ध्येय धोरणे, कामाचे विस्तृत स्वरुप व उपलब्ध सेवा
- महसूल विभागाचे वार्षिक तसेच आठमाही/नऊमाही सुधारित अंदाजपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय कडून संकलित करुन शासनास सादर करणे.
- प्रशासकिय विभागाकडून प्राप्त झालेल्या विविध लेखाशिर्षाखालील अनुदानाचे अधिनस्त कार्यालयांना वितरण करणे व महालेखापाल नागपूर यांचे कार्यालयातील खर्चाच्या नोदींशी त्रैमासिक ताळमेळ घेणे.
- जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत लेखा परिक्षण पथक 1 व 2 यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे तसेच लेखा परिक्षण अहवालातील परिच्छेदापैकी सहाय्यक संचालक (ताळमेळ) यांच्या अधिकार कक्षेतील प्रलंबित परिच्छेदांचे अनुपालन पडताळणे.
- लोकलेखा समिती व महालेखापाल यांच्याकडील जमा व खर्च विषयक परिच्छेदांचा अनुपालन आढावा.
- प्रलंबित तपशिलवार देयके, प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र यांचा आढावा यासह शासनास दर तिमाहीस वित्तीय शिस्तीची माहिती पाठवणे.
- तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालये यांचे रोख पुस्तक तसेच इतर लेखाविषयक दस्तऐवज यांची अचानक तपासणी करणे.
- मा.विभागीय आयुक्त यांचे आदेशान्वये विशेष लेखा परिक्षण करणे.
- विनियोजन लेखे शासनास सादर करणे.
- आयुक्त कार्यालयातील वित्तीय बाबींबाबत अभिप्राय देणे.
- विभागातील महसूल विभागातंर्गत अधिकारी / कर्मचारी यांचे घरबांधणी अग्रीम, मोटार सायकल अग्रीम, संगणक अग्रीम प्रतिक्षा यादी प्रमाणे प्राकलन अधिकारी / जिल्हाधिकारी यांना अनुदान उपलब्ध करुन देणे व या अग्रीमाबाबतची आवश्यक माहिती उपलब्ध करुन देणे.
- मा.विभागीय आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या आदेशान्वये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके तपासून मंजुर करणे.
नवीन काय ?
- खर्चाचे लेखाशीर्ष.(पीडीएफ 444 केबी )
- चुकीच्या नोंदीचे प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाला सादर करण्याच्या कार्यपध्दतीबाबत. (पीडीएफ 906 केबी )
- जमापळताळणी संदर्भात सुधारित पद्धती अवलंबन्याबाबत. (पीडीएफ 2 एमबी)
- विनियोजन लेख्यावरील कमी अधिक खर्चाची कारणे देताना तसेच स्पष्टीकरणात्मक ज्ञापने लोकलेखा समितीला सादर करताना प्रशासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या अभिप्रायाच्या नोंदीबाबत. (पीडीएफ 2 एमबी )
- भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या अहवालातील प्रलंनित निरीक्षण अहवाल/आक्षेप/प्रारूप पनरच्छेद तसेच पनरच्छेदांचा निपटारा त्वरीत करण्यािाित. (पीडीएफ 170 केबी )
- कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या विविध रोखवहया पुर्ण करणेकारीताचा कालबद्ध कार्यक्रम व उपाययोजना. (पीडीएफ 218 केबी)
- रोखवही लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना. (पीडीएफ 367 केबी )
- आकस्मिक खर्चाच्या संक्षिप्त देयकावर काढण्यात आलेल्या रकमांची तपशिलवार देयके विहीत मुदतीत सादर करणेबाबत. (पीडीएफ 162 केबी )
- परिणामकारक अंतर्गत लेखापरीक्षण होण्यासाठीच्या सूचना (पीडीएफ 953 केबी )
- वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांची परिगणना करताना वजाती करावयाच्या ना-देय बाबींबाबत. (पीडीएफ 321 केबी )
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीकरीता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या व तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्यांची निवड करण्याबाबत. (पीडीएफ 161 केबी)
- वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी. (पीडीएफ 161 केबी )
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत.प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत. (पीडीएफ 147 केबी)
- गंभीर आजारांमध्ये अवयव प्रतिरोपण व काही नवीन आजारांचा समावेश करुन सदर आजारांवरील औषधोपचाराकरिता अग्रीम मंजूर करणेबाबत. (पीडीएफ 4 एमबी )
- शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत. (पीडीएफ 319 केबी )
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या देयकांची परिगणना करताना वजाती करावयाच्या नादेय बाबी. (पीडीएफ 168 केबी )
- सहायक अनुदानाच्या देयकांची प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे (Utilisation Certificates – UCs) सादर करणेबाबत. (पीडीएफ 348 केबी )
- महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2025 निधी वितरण. (पीडीएफ 2 एमबी)
- अर्थसंकल्पीय अंदाज 202५-2६ आणि सुधारित अंदाज 2024-25. (पीडीएफ 345 केबी)
- वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978, भाग-पहिला , उप विभाग – एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करण्याबाबत. (पीडीएफ 345 केबी)