बंद

    महसूल शाखा

     महसूल

    या शाखेमार्फत हाताळले जाणारे प्रमुख विषय:

    • महसूल विषयक कामकाजाचे सनियंत्रण करणे.
    • गट अ व ब संवर्गातील अधिकारी यांच्या आस्थापनाबाबतचे कामकाज करणे.
    • गट क व ड संवर्गातील कर्मचारी यांचे शिस्तभंग आदेशावरील अपिले तसेच पोलिस पाटील शिस्तभंग कारवाई विरुध्दच्या अपिलाचे कामकाज पाहणे.
    • वतन जमीन, गौण खनिज, वन जमीन, आदिवासी जमीन, शासकीय अतिक्रमित जमीन, विविध प्रयोजनासाठी शासकीय जमीनीचे वाटप, हक्क नोंदणीबाबतचे प्राप्त अर्जाचे कार्यवाहीचे कामकाज.
    • नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व मदतीबाबतचे कामकाज पहाणे.
    • क्षेत्रीय स्तरावरील महसूल कार्यालयांची वार्षिक तपासणी करणे, जिल्हाधिकारी यांचे मासिक दैनंदिनीवर अभिप्राय देणे, नवीन महसुली कार्यालयांचे निर्मितीविषयक कामकाज पाहणे, क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा महसूल दिनी गौरव-सन्मान करणे, महसुली गावाचे नावात बदल करणे विषयक कामकाज पाहणे.

    या शाखेबाबत अधिक तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत या संकेतस्थळाच्या दस्तऐवज विभागात उपलब्ध आहे.

    शासन निर्णय
    अ.क्र विभागाचे नाव विषय पीडीएफ
    1 महसूल व वन विभाग कमाल मर्यादा अधिसूचना १९-१-२०२४. View [PDF 152 KB]
    2 महसूल व वन विभाग मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 चे कलम 5 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 143 अन्वये दाखल दाव्यांमध्ये आदेशाच्या अंमलबजावणीची खात्री करण्याकरीता स्थळपहाणी पंचनामा व जिओ टॅग फोटो घेणेबाबत सर्व क्षेत्रीय अधिकारी/प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत. View [PDF 178 KB]
    3 महसूल व वन विभाग राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत. View [PDF 178 KB]
    4 महसूल व वन विभाग राज्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत. View [PDF 186 KB]
    5 महसूल व वन विभाग राज्यात अमरावती जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. View [PDF 183 KB]
    6 महसूल व वन विभाग राज्यात यवतमाळ, वाशिम व सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. View [PDF 182 KB]
    7 महसूल व वन विभाग राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. View [PDF 190 KB]
    8 महसूल व वन विभाग तुकडेबंदी अधिसूचना. View [PDF 628 KB]