प्रशासकीय रचना
लोकशाही व्यवस्थेत, विकेंद्रित नियोजना द्वार विकासात लोकांचे महत्त्वाचे योगदान असते. सामूहिक विचार, चर्चा आणि जनतेचे मार्गदर्शन करण्याचे काम गाव पातळी वर ग्राम पंचायती, तालुका पातळी वर पंचायत समिती आणि जिल्हा पातळी वर जिल्हा परिषद करतात.
अमरावती विभागात ५ जिल्हे (अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ) आणि ५६ तहसील(अमरावती-१४, अकोला-७, बुलढाणा-१३, वाशिम-६, यवतमाळ-१६) आहेत.
लोकप्रतिनिधी, लोकसेवक आणि स्वयं सेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांनी सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. नियोजन रचनेत जिल्हा विकेंद्रित प्रणाली ची महत्त्वाची भूमिका असते.
जिल्हे
अमरावती विभाग, ज्याला वऱ्हाड असे ही म्हणतात, हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सहा प्रशासकीय विभागां पैकी एक आहे.अमरावती आणि नागपूर विभाग हे प्राचीन विदर्भ प्रदेश बनवतात.
अमरावती विभाग उत्तरे ला मध्यप्रदेश राज्य, पूर्वेला नागपूर विभाग, आग्नेये ला तेलंगणा राज्य, दक्षिण आणि नैऋत्ये ला मराठवाडा प्रदेश (औरंगाबादविभाग) आणि पश्चिमेला नाशिक विभागयांनी वेढलेला आहे. अमरावती विभाग पाच जिल्ह्यांनी बनलेला आहे जे खालील प्रमाणे आहेत.
- अमरावती
- अकोला
- बुलढाणा
- वाशिम
- यवतमाळ