➤ अमरावती विभागातील पुनर्वसन शाखेमध्ये सिंचन अनुशेष व अनुशेषा व्यतिरिक्त प्रकल्पांतर्गत भूसंपादन व पुनर्वसनाची कामे तसेच राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे महामार्ग, विमानतळ इ. प्रकल्पांतर्गतचे भूसंपादनांच्या कामांचे संनियंत्रण केल्या जाते.
➤ पुनर्वसन शाखेमध्ये खालील कायद्यांनुसार कामकाज चालते.
- न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३
- महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश, महसूल व वन विभाग दि. २७.०८.२०१४
- महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९
- भूमी संपादन अधिनियम, १८९४
- रेल्वे अधिनियम, १९८९
- राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६
- A Manual of Guidelines on Land Acquisition for National Highways under The National Highways Act, १९५६
- महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५
➤पुनर्वसन शाखमध्ये प्रत्यक्ष चालणारे महत्वाचे कामकाज.
- महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ कलम ११ (१) व कलम १३ (३) ची अधिसुचना प्रसिद्धी
- न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १८ नुसार पुनर्वसन आराखडा मंजुरी
- महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ कलम १० (३) नुसार पुनर्वसित गावठाणात पुरवावयाच्या १८ नागरी सुविधा अंदाजपत्रकांना मान्यता प्रदान करणे (मा. विभागीय आयुक्त- प्रशासकीय मंजुरी अधिकार रु. १ ते १० कोटी पर्यंत)
- पीएमजी व प्रगती पोर्टलवरील विषयांचा आढावा
- गावठाण विस्तार योजना प्रकरणे
- अमरावती विभागातील पुरग्रस्त पुनर्वसन
- मुल्यांकन तज्ञ पथक व भूसंपादन अधिकारी यांचे अस्थायी पदांना मुदतवाढीचे प्रस्ताव शासनास सादर करणे व आस्थापना विषयक बाबी.
| अ.क्र | विभागाचे नाव | विषय | पीडीएफ |
|---|---|---|---|
| 1 | महसूल व वन विभाग | सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपद्धती. | पहा [पीडीएफ 2.96 MB] |
| 2 | महसूल व वन विभाग | भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम, 2014 खालील निवाडयासंदर्भात अनुसरावयाची कार्यपद्धती. | पहा [पीडीएफ 168 KB] |
| 3 | महसूल व वन विभाग | भुसंपादन अधिनियमानुसार भुसंपादनाबाबत करावयाची कार्यवाही तसेच भुधारकांना भुसंपादन मोबदला विहित कालावधीत वितरीत करणेबाबत. | पहा [पीडीएफ 168 KB] |
| 4 | महसूल व वन विभाग | भूमिसंपादन…..अधिनियम, 2013 वा अन्य अधिनियमानुसार संपादक संस्थेकडून प्राप्त भूसंपादन प्रस्तावाबाबत प्राथमिक अधिसूचनेनंतर करावयाच्या संयुक्त मोजणी व त्यानुसार अचूक नोंदी घेण्याची कार्यपद्धती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. | पहा [पीडीएफ 1711 KB] |
| 5 | महसूल व वन विभाग | खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेणेबाबत. | पहा [पीडीएफ 373 KB] |